पुणे- काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आलेल्या सराईत गुंडाची डोक्यात फरशी घालून हत्या करण्यात आली. निलेश उर्फ गोट्या विठ्ठल शेंडगे (वय 22) असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे. हा प्रकार काल (दि. 9 जाने.) मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निलेश शेडगे एका दरोड्याचा गुन्ह्यात तुरुंगात होता. पंधरा दिवसांपूर्वीच तो येरवडा कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडे वस्तीत त्याचे काही मुलांशी भांडण झाले. त्यानंतर तीन ते चार जणांनी त्याला मारहाण करत डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली.