पुणे- राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आता राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे. खबरदारी म्हणून उपचारासाठी 510 खाटाची व्यवस्था पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करण्यात आली आहे. रुग्णांना कुठलीही कमतरता भासणार नाही. त्यांना सर्व सुविधा मिळत असल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
COVID19 : 'पुण्यात आणखी एक रुग्ण, कोरोनासाठी खबरदारीचा नवा प्लॅन आखणार' - पुणे कोरोना बातमी
खबरदारी म्हणून 510 खाटांची व्यवस्था पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात करण्यात आली आहे. रुग्णांना कुठलीही कमतरता भासणार नाही. त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत. काल सात देशातून नागरिक येणार होते. ते कोणीही आले नाहीत.
हेही वाचा-कोरोना : मास्क अन् सॅनिटायझरचा काळाबाजार; पुण्यातील चार मेडिकल दुकाने सील
गुरुवारी सात देशातून नागरिक येणार होते. ते कोणीही आले नाहीत. आज रात्रीपर्यंत कोरोना बाबतच्या खबरदारीचा एक प्लॅन आखला जाणार आहे. आतापर्यंत 700 परदेशी रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण रुग्णालयातून काही लोकांना संपर्क करत आहेत. त्यांना काही त्रास होत नाही. त्यांना कुठलीही कमतरता भासणार नाही. त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत. मात्र, याबाबत लोकांना चुकीची माहिती देणे खपवून घेतले जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच सुचनांचे नागरिकांनी पालन करावे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.