महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेल्हा-जेजुरी मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यू - बेल्हा-जेजुरी नवा राज्यमार्ग

बेल्हा-जेजुरी मार्गावर अपघातामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल खंडु सिनलकर, असे मृत तरुणाचे नाव आहे. हा दुदैवी अपघात नसुन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा बळी असल्याचा, आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

बेल्हा-जेजुरी मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यु

By

Published : Aug 14, 2019, 7:04 PM IST

पुणे - आंबेगाव व शिरुर तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका उच्चशिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशाल खंडु सिनलकर, असे मृत तरुणाचे नाव आहे.

बेल्हा-जेजुरी मार्गावरील अपघातात तरुणाचा मृत्यु
खराब रस्त्यांमुळे उत्तर पुणे जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच असुन यामध्ये अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. बेल्हा-जेजुरी हा नवा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार होत आहे. मात्र, या मार्गावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी जात आहेत. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग प्रवास करत असतो. मात्र, या परिसरात कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.विशाल हा रांजणगाव येथील नामंकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता. लोणी ते रांजणगाव असा प्रवास करत असताना हा भिषण अपघात घडला. मात्र अपघातस्थळी विशालला वेळेवर मदत मिळाली नाही. हा दुदैवी अपघात नसुन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा बळी असल्याचा, आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details