पुणे - पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षाची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि रिक्षाच्या बॅटरी, असा एकूण 81 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. याप्रकरणी राजाराम तेजाराम खावो (वय- 38) याला अटक करण्यात आली आहे. बॅटरी चोरी करतानाचा एक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवत कारवाई केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये बॅटऱ्या चोरणारा आरोपी जेरबंद; घटना सीसीटीव्हीत कैद - पुणे क्राइम
पिंपरी-चिंचवड परिसरात रिक्षाची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि रिक्षाच्या बॅटरी, असा एकूण 81 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय.
राजाराम खावो हा आरोपी अगोदर गॅस एजन्सीवर काम करायचा. तिथेच अनेकांचे घरगुती आणि व्यवसायिक गॅस चोरी करत होता. दरम्यान तो रिक्षाची देखील बॅटरी चोरत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस अधिकारी अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकातील कर्मचारी आशिष गोपी आणि समीर रासकर यांना त्याचा शोध घेण्यासाठी पाठवले. या आरोपीने रिक्षाची बॅटरी चोरी केली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार संबंधित आरोपीला सांगवी परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 81 हजार रुपयांचा माल हस्तगत केला असून संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमित देवकर, संतोष महाडिक यांनी केली आहे.