पुणे - दुर्धर आजाराने ग्रासलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. हा प्रकार पिंपरीतील खराळवाडी येथे सोमवारी मध्यरात्री घडला. ही घटना जवळच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुपचंद धोंडीराम सुंदेचा (वय ८५) असे ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.
आजारपणाला कंटाळून वृद्धाची पेटवून घेऊन आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद - fire
रुपचंद धोंडीराम सुंदेना मागच्या काही वर्षांपासून एका दुर्धर आजाराने पीडित होते. यामुळे काही दिवसांपासून त्यांना नैराश्याने ग्रासले. अखेर सोमवारी मध्यरात्री त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. यामध्ये गंभीररीत्या भाजल्याने त्यांना यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपचंद धोंडीराम सुंदेना मागच्या काही वर्षांपासून एका दुर्धर आजाराने पीडित होते. यामुळे काही दिवसांपासून त्यांना नैराश्याने ग्रासले. अखेर सोमवारी मध्यरात्री त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. यामध्ये गंभीररीत्या भाजल्याने त्यांना यशवंतराव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुपचंद सुंदेचा मागच्या काही दिवसांपासून एकटेच राहत होते. त्यांना जवळचे असे कोणीही नव्हते अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.