पुणे - नैराश्येपोटी एका ज्येष्ठ नागरिकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जीलानी मस्जिदसमोर हा प्रकार घडला. सुरेश माधवराव कुलकर्णी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकाचे नाव आहे. आपल्या दीड वर्षांच्या नातवास सून भेटू देत नाही म्हणून या वृद्धाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
सून नातवाला भेटू देईना... वृद्धाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुण्यातील घटना - old
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुलकर्णी यांच्या मुलाचा प्रेमविवाह झाला असून, त्याला दीड वर्षांचा मुलगा आहे. परंतु काही कारणामुळे त्यांची सून मुलाला घेऊन माहेरी राहत आहे. नातवाचा लळा लागलेल्या सुरेश कुलकर्णी यांनी नातवाला भेटण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कुलकर्णी यांच्या मुलाचा प्रेमविवाह झाला असून, त्याला दीड वर्षांचा मुलगा आहे. परंतु काही कारणामुळे त्यांची सून मुलाला घेऊन माहेरी राहत आहे. नातवाचा लळा लागलेल्या सुरेश कुलकर्णी यांनी नातवाला भेटण्याचा प्रयत्न केला. पण, सुनेने त्यांना भेटू दिले नाही. याच नैराश्येतून त्यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि कीटकनाशक प्राशन केले होते. जीलानी मस्जिद समोरील रस्त्यावर ते बेशुद्धावस्थेत पडले होते.
सोमवारी (१५ एप्रील) पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जीलानी मस्जिदजवळ एक नागरिक बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या खिशात कीटकनाशकाची बाटली आणि चिट्ठी होती. पोलिसांनी कुलकर्णी यांच्या फोनवरून त्यांच्या पत्नीला फोन करून रुग्णालयात बोलावून घेतले. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचवल्याचे बोलले जात आहे.