महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जम्बो कोविड सेंटरमधून काढण्यात आलेल्या 'त्या' परिचरिकांचा अखेर पगार झाला! - पिंपरी-चिंचवड कोविड केअर सेंटर

पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरमधून तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या 32 परिचरिकांना मनसेच्या आंदोलनानंतर वेतन देण्यात आले. मात्र ठरल्याप्रमाणे न देता प्रत्येकी १० हजार रुपये कमी दिले.

nurses who were removed from the Jumbo Covid Center
जम्बो कोविड सेंटरमधील परिचारिकांचा पगार झाला

By

Published : Oct 27, 2020, 8:45 PM IST

Updated : Oct 27, 2020, 8:59 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) -पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरमधून 32 परिचारिकांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले होते. तसेच त्यांना जेमतेम पगार देण्यात आला होता. या प्रकरणी मसनेच्या कार्यकर्त्यांनी कोविड सेंटरवर जाऊन मनसे स्टाईल आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसात संपूर्ण पगार देऊ, असे आश्वासन ठेकेदाराकडून देण्यात आले. मात्र आठवडाभरानंतर आज ठरल्याप्रमाणे पगार न देता प्रत्येकी दहा हजार रुपये कमी देण्यात आल्याने परिचरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

परिचारिकांना अखेर वेतन मिळाले
पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरू नगर येथे महानगर पालिकेने कोरोना रुग्णासाठी जम्बो कोविड सेंटर उभारले होते. ते कंत्राटदाराला चालवायला दिले. दरम्यान, गेल्या आठवड्यात अचानक तडकाफडकी 32 परिचरिकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि ठरल्याप्रमाणे पगार न देता जेमतेम 4-5 हजार रुपये देऊन घरचा रस्ता दाखवला. मात्र, या प्रकरणी परिचरिकांनी कडक पवित्रा घेत संपूर्ण पगार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केला. तर, दुसऱ्या दिवशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट जम्बो कोविड सेंटरमध्ये जात मनसे स्टाईल आंदोलन केले. ठेकेदाराने चार दिवसात पगार करतो असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आज आठवडाभरानंतर प्रत्येकी दहा हजार रुपये कमी देत ठेकेदाराने पगार केला आहे. अशी माहिती सिंधू वासमवार यांनी दिली असून पगार कमी दिल्याने परिचरिकांमध्ये नाराजी आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Oct 27, 2020, 8:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details