पुणे - पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कृष्णा नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मागील पाच-सहा महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंडाला बेड्या; गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे हस्तगत - pimpri chinchwad crime news
पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला कृष्णा नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून या कारवाईत गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील कुख्यात आक्या बॉण्ड टोळीतील गुंड विकास उर्फ पांग्या धोंडीराम जाधव याला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विकास कुख्यात आक्या बॉण्ड टोळीचा सदस्य आहे. याच टोळीतील सदस्यांनी काही दिवसांपूर्वी टोळी वर्चस्वातून एका तरुणाचा खून केला होता. संबंधित टोळी मोठ्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असते. संबंधित कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी विश्वास नानेकर, मंगेश गायकवाड, चेतन सावंत, विपुल होले, संतोष सपकाळ, सचिन नलावडे, कबीर पिंजारी यांनी केली आहे. तसेच अधिक तपास अद्याप सुरू आहे.