पुणे - राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावातील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील लोक गावात येऊ नये म्हणून गावात येणारा रस्ता बंद करून गावात येणाऱयांवर गावबंदी केली आहे.
कोरोनामुळे आंबेगावमधील आहुपे गावात 'नो एन्ट्री'; येण्याजाण्याचे रस्ते बंद - आहुपे गावबंदी
गावाच्या चारही बाजुने येणाऱ्या रस्त्यावर मोठा लाकडी ओंडका लावून प्रवेश बंद केला आहे. गावातील कोणतीही व्यक्ती गावातून बाहेर जाणार नाही आणि बाहेरील कोणतीही व्यक्ती गावात येणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे.
गावाच्या चारही बाजुने येणाऱ्या रस्त्यावर मोठा लाकडी ओंडका लावून प्रवेश बंद केला आहे. गावातील कोणतीही व्यक्ती गावातून बाहेर जाणार नाही आणि बाहेरील कोणतीही व्यक्ती गावात येणार नाही, याचीही खबरदारी घेतली जात आहे. आदिवासी भागातील अनेकजण पुणे आणि मुंबईमध्ये कामानिमित्त वास्तव्यास आहे. सध्या कोरोनाचे संशयित रुग्ण शहरी भागात आढळून येत असताना शहरातील नागरिकांनी गावाकडे पळ काढला आहे. यामुळे गावात हा रोग होवू नये म्हणून गावकऱ्यांनी ही शक्कल लढवून गावात यायचा रस्ताच बंद करून संचारबंदी लागू केली आहे .