पुणे - देशावर कोरोनाचे संकट असताना महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ घोंगावत आहे. पुणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. काही ठिकाणी इमारतींवरील पत्रे उडाले आहेत, तर विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात अनेक गावांची बत्ती गुल झाल्याने ही गावे आज अंधारात राहण्याची शक्यता आहे.
निसर्ग चक्रीवादळ : पुण्यात विजेचे खांब उन्मळून पडले, अनेक गावातील 'बत्ती गुल' - निसर्ग चक्रीवादळ बातमी
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. या वादळात अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडे पडून नुकसान झाले आहे.
![निसर्ग चक्रीवादळ : पुण्यात विजेचे खांब उन्मळून पडले, अनेक गावातील 'बत्ती गुल' Pune Rain](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-05:57-mh-pun-5-mseb-vis-mh10013-03062020175632-0306f-1591187192-25.jpg)
पुणे पाऊस
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागात चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. या वादळात अनेक ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडे पडून नुकसान झाले आहे.
दरम्यान, चक्रीवादळ व पावसाची तीव्रता अद्याप कमी झाली नाही. डोंगराळ भागात महावितरणच्या विद्युत वाहिनीचे नुकसान झाल्याने वीज बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात राहण्याची शक्यता आहे.