महाराष्ट्र

maharashtra

'यापुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अभिषेक नाही,' विश्वस्त समितीच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध

By

Published : Dec 26, 2019, 9:27 PM IST

राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या विश्वस्त समितीने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजा होणार नाही. समाधीची होणारी झीज आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी दिली.

alandi dyaneshwar samadhi
यापुढे ज्ञानेश्वरांच्या समाधीवर अभिषेक नाही,

पुणे - राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या विश्वस्त समितीने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधीवर अभिषेक आणि पूजा होणार नाही. समाधीची होणारी झीज आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी दिली. मात्र, या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध असून, यावरुन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापुढे ज्ञानेश्वरांच्या समाधीवर अभिषेक नाही

समाधीवर होणाऱ्या ४ ते ५ भाविकांच्या अभिषेक आणि पूजेसाठी हजारो वारकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. तसेच अभिषेक करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमुळे समाधीची झीज होत असल्याचा अहवाल पुरातत्व विभागाने दिला आहे. त्यानुसार विश्वस्तांच्या बैठकीत ठराव मांडण्यात आता असून, हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती माहिती मुख्य विश्वस्त विकास ढगे-पाटील, अभय टिळक, डॉ अजित कुलकर्णी यांनी दिली.

या अभिषेकचे स्वरूप बदलून चल पादुकांचे अभिषेक केले जाणार आहेत. मात्र, या निर्णयाला पुजाऱ्यांची संमती नसल्याने यावरुन पुढील काळात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

ABOUT THE AUTHOR

...view details