महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय सफरचंदांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देणार - मिलिंद कांबळे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भारतातील उद्योगांच्या परिस्थिती संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आआयएम जम्मूचे प्रमुख मिलिंद कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय सफरचंदाचे ब्रँडिंग करणार असल्याची माहिती दिली.

मिलिंद कांबळे, आआयएम जम्मूचे प्रमुख

By

Published : May 14, 2019, 6:06 PM IST

पुणे - भारतीय सफरचंदाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार-प्रसार करण्यासाठी लवकरच सफरचंद उत्पादकांच्या मदतीने नवीन प्रकल्प येणार आहे, अशी घोषणा आयआयएम जम्मूचे नवनिर्वाचित अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी मंगळवारी पुण्यात केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भारतातील उद्योगांच्या परिस्थिती संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कांबळे बोलत होते.

कांबळे म्हणाले, की माझी नुकतीच आयआयएम जम्मूच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मी स्वतः एक उद्योजक आहे. त्याप्रमाणेच आयआयएम ही देशातील व्यवस्थापन शास्त्राचे प्रशिक्षण देणारी प्रतिष्ठित आणि मोठी संस्था आहे. या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील सफारचंदांना अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेत प्रतिष्ठा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय सफरचंदाचे ब्रँडिंग करण्यासाठी आम्ही सफरचंद उत्पादकांच्या मदतीने नवीन प्रकल्प सुरू करणार आहोत. यासाठी आयआयएम जम्मूच्या कौशल्य आणि वाणिज्य मंत्रालयाच्या मदतीने लवकरच हा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही मिलिंद कांबळे यांनी सांगितले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details