महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभरात २२ कोरोनाबाधित रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज - corona latest news

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. इंदिरानगर चिंचवड, मोशी, रुपीनगर, संभाजीनगर, गणेशनगर तळवडे व मधुबन सोसायटी सांगवी येथील रहिवासी असलेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

corona virus
corona virus

By

Published : May 19, 2020, 10:01 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक २२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या २२६ वर पोहोचली आहे. तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.सोमवारी शहरातील विविध परिसरातील आणि पुण्यातील येरवडा तसेच नवी मुंबई येथील रुग्णांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सोमवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे रहाटणी, भाटनगर, भोसरी, आनंदनगर चिंचवड, दिघी, येरवडा आणि नवी मुंबई येथील परिसरातील आहेत. त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

इंदिरानगर चिंचवड, मोशी, रुपीनगर, संभाजीनगर, गणेशनगर तळवडे व मधुबन सोसायटी सांगवी येथील रहिवासी असलेल्या सहा कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील सोमवारी मध्यरात्रीपासून हा परिसर सील करण्यात येणार

अमृतधारा, दिघी येथील ( विठ्ठल रुक्मिणी मंदिरा समोर अर्जुन जीम, ओयो होम, जेनेसिसच-होली समोर आळंदी रोड – ममता स्वीट्स - विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ), मोरेवस्ती, चिखली येथील ( ओम मिनी मार्केट अष्टविनायक चौक – एक्सीस बँक एटीम, तुषार पान सेंटर समोर, बिस्मिला चिकन शॉप समोर, कल्पना टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स - ओम मिनी मार्केट) भाटनगर, पिंपरी येथील( किर्वे टेलर समोर - रेल्वे लाईन - राधिका अपार्टमेंट - रेल्वे लाईन - डायमंड स्पोर्टस - लिंक रोड - किर्वे टेलरसमोर )

ज्ञानंगगा सोसयटी, रहाटणी येथील ( श्री गार्डन टी स्पॉट - निर्मल बंगला - आर.आर.जी.२ सोसायटी रोड - रॉयल रहार्डका ग्रीन्स फेज २ - रॉयल ऑरेंज कांऊटी रोड - ज्ञानगंगा सोसयटी रोड - श्री गार्डन टी स्पॉट ) आणि हनुमान कॉलनी,भोसरी येथील (फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स - दुर्गामाता मंदिर - राजगुरु बँक समोर - फॅन्सी काम्प्युटर पेरिफेरल्स ) परिसर सोमवार मध्यरात्रीपासून कन्टेन्मेंट झोन घोषित करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details