पुणे -कोरोनाच्या सावटाखाली पार पडत असलेल्या जगद्गुरू संत तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान पार पडले. पालखी सोहळा देहूनगरीत मुक्कामी असताना हे कसं काय पार पडलं? असा प्रश्न वारकरी संप्रदयासह अख्ख्या महाराष्ट्राला पडला असेलच. परंपरेनुसार नीरा स्नान पार पडायचं तिथून देहू संस्थानने रात्रीतच हंडाभर पाणी आणले आणि तुकोबांच्या मंदिरा लगतच्या इंद्रायणी नदीत हा सोहळा पार पाडला.
जगद्गुरू संत तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान, पाहा व्हिडिओ - तुकाराम महाराज पालखी
कोरोनाचा संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान 12 जूनला ठेवले होते. त्यानंतर 30 जूनला पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे. दरम्यान, आज इंद्रायणी नदीत नीरा स्नान पार पडले आहे. तुकोबांच्या पादुका मंदिरातून इंद्रायणी नदीत नेण्यासाठी फुलांच्या पायघड्याही टाकण्यात आल्या होत्या.
कोरोनाचा संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थित जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान 12 जूनला ठेवले होते. त्यानंतर 30 जूनला पालखी पंढरपूरला रवाना होणार आहे. दरम्यान, आज इंद्रायणी नदी पात्रातच 'नीरा स्नान' पार पडले आहे. तुकोबांच्या पादुका मंदिरातून इंद्रायणी नदीत नेण्यासाठी फुलांच्या पायघड्याही टाकण्यात आल्या होत्या. इंद्रायणी नदीत आरती आणि विधिवत पूजा पार पडली.
कोळी समाज त्यांच्या होडीतून तुकाराम महारांजांच्या पादुका सोलापूर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीत घेऊन जात असत. त्यानंतर त्या ठिकाणी पादुकांना विधीवत नीरा स्नान घातले जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे या सेवेत खंड पडू नये म्हणून नीरा नदीचे पाणी आणून इंद्रायणी पात्रामध्येच कोरोनाशी निगडित नियमांचं पालन करून पादुकांना ऐतिहासिक नीरा स्नान घालण्यात आले.