राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर रुबी रुग्णालयात दाखल - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातीलच एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना शनिवारी रुबी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यातीलच एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू, प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना शनिवारी रुबी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
काही दिवसापूर्वी रुपाली चाकणकर या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्या आजारी पडल्या होत्या. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतू, प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा न झाल्याने त्यांना शनिवारी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून, काळजी करण्याचे कारण नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.