पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात ईडीकडून नोटीस काढण्यात आली आहे. ईडीमार्फत केलेल्या या कारवाईचा निषेध करत बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत तीव्र निदर्शने केली.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तीव्र निदर्शने, ईडीच्या कारवाईचा निषेध - pune politics news
राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली असून पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. राज्यातील सरकार सूडबुद्धीने शरद पवार यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंडईच्या टिळक पुतळा येथे निदर्शने केली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडल्यानंतर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाली. पोलिसांनी आक्रमक कार्यकर्त्यांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने सुरू केली. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत मंडई पोलीस चौकीत नेले. तर, या ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलीस चौकीतच गोंधळ घातला त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना शांत करत चौकीच्या आत नेले.
हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार