महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NCP Protest: 'मोदी-शाह महाराष्ट्रात सुरतच्या छापाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत', राष्ट्रवादीची टीका - प्रशांत जगताप

राज्यातील वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn), एअरबस (airbus project) पाठोपाठ आत्ता सफ्राँन प्रकल्प (saffron project) देखील दुसऱ्या राज्यात गेल्याने आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. (NCP protest over projects moving to gujrat).

NCP Protest
राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

By

Published : Oct 31, 2022, 7:25 PM IST

पुणे: राज्यातील वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn), एअरबस (airbus project) पाठोपाठ आत्ता सफ्राँन प्रकल्प (saffron project) देखील दुसऱ्या राज्यात गेल्याने आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. (NCP protest over projects moving to gujrat).

राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन
राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

काय म्हणाले शहराध्यक्ष प्रशांत जगताप: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, "राज्यात ईडी सरकार आल्यापासून सातत्याने राज्यात येणारे नवीन प्रकल्प हे गुजरातला जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राकडे आकसाने बघत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर जो छापा टाकला होता तो छापा मोदी, शाह आणि त्यांचा लोकांना टोचतो आहे. म्हणूनच सुरतच्या छाप्याच्या बदला घेण्यासाठी महाराष्ट्राला कंगाल करण्याचे आणि येथील युवकांना बेरोजगार करण्याचे काम भाजपकडून केलं जातं आहे, अशी टीका यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

राष्ट्रवादीचे पुण्यात आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details