महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांची पुण्यात भेट, भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज भेट झाली. शरद पवार यांचे भाऊ प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना सुरुवात झालीय. या भेटीनंतर अजित पवार थेट दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 4:56 PM IST

Sharad Pawar
Sharad Pawar

पुणे Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात भेट झाली. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट झाली. दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांची भेट असल्याची माहिती मिळतेय. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

'ही एक कौटुंबिक भेट होती, दिवाळीनिमित्त आम्ही सर्व एकत्र आलो होतो. आम्ही बराच वेळ एकत्र होतो. सगळ्या मुली, भावंड आज एकत्र आले होते. विशेष म्हणजे आज प्रतापराव पवार यांचा वाढदिवस आहे.- सरोज पाटील, शरद पवार यांची बहीण

भेट कौटुंबिक : शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांची भेट झाली. प्रतापराव पवार हे पुण्यातील बाणेरमध्ये राहतात. सर्वांची त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. त्यानंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ही भेट कौटुंबिक होती.

पवारांनी दिल्या जनतेला दिवाळीच्या शुभेच्या : यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची जावो, असं शरद पवार यांनी म्हटलंय. त्यानंतर पत्रकारांनी अजित पवार, प्रतिभाताई पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, सर्वांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान, आज पुण्यात शरद पवार तसंच अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. अजित पवार दिल्लीत अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Protest : शरद पवारचं मराठा आरक्षणाचे हिटलर - आरक्षण अभ्यासक नामदेव जाधवांचा हल्लाबोल
  2. Sanjay Raut on EC : शिवसेना कुणाची? पाकिस्तानला माहिती, पण निवडणूक आयोगाला नाही-संजय राऊत
  3. Bombay HC On Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा दिलासा; 14 वर्षांपूर्वीचा गुन्हा उच्च न्यायालयानं केला रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details