महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक : पुण्यात काँग्रेस नेत्यांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीची संयुक्त बैठक - loksabha

बारामती लोकसभा मतदारसंघात काही प्रमाणात वातावरण बदलल्याचे चित्र आहे. एकीकडे भाजपकडून स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भोर, वेल्हा, इंदापूर, पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात बिघडलेले वातावरण लक्षात घेऊन अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीची पुण्यात संयुक्त बैठक

By

Published : Mar 29, 2019, 8:38 PM IST

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी सध्या आघाडीमधील नेत्यामंध्ये मदतीवरून मतभेद सुरू आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आज (शुक्रवार) अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील निवासस्थानी संयुक्त बैठक आयोजित केली होती. दोन्ही काँग्रेसमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण रहावे, या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादीची पुण्यात संयुक्त बैठक


ही बैठक हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, पुरंदर येथील काँग्रेस नेते आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यासोबत घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कूल यांना उमेदवारी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात काही प्रमाणात वातावरण बदलल्याचे चित्र आहे. एकीकडे भाजपकडून स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भोर, वेल्हा, इंदापूर, पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात बिघडलेल्या वातावरण लक्षात घेऊन अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातील या विधानसभा परिसरात कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या गैरसमजाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.


एकंदरीतच लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला मदत करत असताना विधानसभा निवडणुकीसाठी देखील अशाचप्रकारे वातावरण राहिले पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते बैठक घेऊन जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असे या बैठकीत ठरवण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांनी देखील वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, असे स्पष्ट केले

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details