मुंबई -दादर येथील इंदू मिल परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या बाबासाहेबांच्या स्मारकाची कामाची पाहणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2023मध्ये पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच आमचे राजकारण हे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे आहे. यामुळे या स्मारकाबाबत आमच्या सर्वांच्या मनात उत्सुकता आहे, असेही त्या म्हणाल्या.
कोरोनामुळे काम धिम्या गतीने सुरू होते. मात्र, आता पुन्हा हे काम जलद गतीने सुरू झाले. ही वास्तू आमच्या सर्वांसाठी महत्त्वाची वास्तू राहणार आहे. त्यामुळे त्याचे कामाची पाहण्यासाठी आज आलो होतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेही उपस्थित होते.