पुणे - आर्यन खान प्रकरणात मी एक आई म्हणून याचं उत्तर देईल की कुठल्याही आईसाठी हा खूप दुःखाचा विषय आहे. कुठल्याही कुटुंबासाठी हे झालं असेल तर ते दुर्दैवी आहे. जी काही माहिती मिळत आहे की, आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही. तस जर काही असेल आणि एखादा मुलगा निर्दोष असेल, त्याला 26 दिवस न्यायालयीन कोठडी करत असतील तर हा कुठला न्याय आहे? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. जर त्याने तो गुन्हा केला नसेल तर याचा उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. 26 दिवसानंतर असे कळते आहे की, की त्याच्याजवळ काहीच सापडलं नाही तर मग 26 दिवस काय केले? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे.
एका अधिकाऱ्यामुळे महाराष्ट्राची आणि भारताची प्रतिमा इंटरनॅशनल खराब -
ड्रग्स तर खूप मोठी गोष्ट आहे. मी तर तंबाखूच्या विरोधात आंदोलन करत असते. अशा सर्व अंमली पदार्थातुन समाजात मुलांचे पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यांना तुरुंगवास देणे नाही. त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. मात्र, काही अधिकारी अशी काही भाष्य करतात आणि कोणाच्याही मुलांवर अन्याय होत असेल तर हे महाराष्ट्र आणि देशासाठी हे योग्य नाही. बॉलिवूड हे इंटरनॅशनल आहे. भारताची आणि महाराष्ट्राची ओळख ही जगामध्ये बॉलिवूडबाबत विचारत असतात. त्यामुळे अशा जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा महाराष्ट्राचे नाव खराब होतेच. मात्र, त्याचबरोबर देशाचेही नाव खराब होते. त्यामुळे ड्रग्सच्या विरोधात आपण सर्वांनी आंदोलन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
आघाडीबाबत तिन्ही नेते निर्णय घेणार -
आघाडीबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे घेणार आहेत. अनेक लोक अशी आहेत की, ज्यांनी 5 वर्षात काहीही काम केलेले नाही. सिग्नलमध्येच 58 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे.
केंद्राने 8 दिवसासाठी 50 टक्के डिस्काउंट दिलं पाहिजे -