महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी निवडणूक लढवणार नाही; शरद पवारांची घोषणा, पार्थ पवार मावळमधून लढण्याचे संकेत - pawar

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात होते. तसे त्यांनी संकेतही दिले होते. मात्र, अचानक शरद पवारांनी आपला निर्णय बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार, पार्थ पवार

By

Published : Mar 11, 2019, 5:43 PM IST

पुणे- परिवारामधून अधिक उमेदवार नको म्हणून मी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या आहेत. एकदाही पराभव झाला नाही, त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता मी निवडणुकीला घाबरण्याचा प्रश्नच नसल्याचे पवार म्हणाले. दरम्यान पार्थ पवारांचीही मावळमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात होते. तसे त्यांनी संकेतही दिले होते. मात्र, अचानक शरद पवारांनी आपला निर्णय बदलत मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नविन पिढीला संधी देणार असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी स्थानिक कार्यकर्ते आणि शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पार्थ यांचीही मावळमधून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार...

दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार असल्याचेही पवार म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी माझी बोलणी झाली आहेत. त्यांच्या सूचनेप्रमाणे जागा सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मी आजवर कधीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोललो नसल्याचेही पवार म्हणाले. आमची यादी तयार आहे आम्ही काँग्रेसची वाट पाहत असल्याचेही पवार म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details