महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लष्कराच्या वैद्यकीय तज्ज्ञांची राष्ट्रीय बैठक; वैद्यकीय संशोधनाबाबत होणार मंथन - बिपीन पुरी

संरक्षण दलांच्या वैद्यकीय संशोधन समितीच्या ४ दिवसीय बैठकीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे. या बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांमधील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत.

लष्कराच्या तिन्ही दलांमधील वैद्यकीय अधिकारी

By

Published : Feb 6, 2019, 12:11 PM IST

पुणे - देशाच्या संरक्षण दलांच्या वैद्यकीय संशोधन समितीच्या ४ दिवसीय बैठकीला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे. लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी आणि लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे (एएफएमसी) प्रमुख रवी कारला बैठकीला उपस्थित आहेत.

पुण्यातील लष्करी महाविद्यालयांमध्ये आयोजित बैठकीमध्ये लष्कराच्या तिन्ही दलांमधील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. या परिषदेमध्ये लष्करासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि संशोधनासंदर्भात मंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details