पुणे - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे शुक्रवारी त्यांच्याच गावच्या यात्रेला उशीराने पोहचले. मात्र, यावेळीही वाहतूक कोंडीने आपल्याला यायला उशीर झाल्याचे सांगत वाहतूक कोंडीचे खापर आढळराव पाटीलांवरच फोडत निकाली कुस्तीत तुमची ताकत दिसेल...! अन् पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल, नारायणगावच्या यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल, असे सांगत पुढच्या यात्रेत या ठिकाणी भावी खासदार म्हणून आपणच असेल, असा आत्मविश्वास दर्शवला.
निकाली कुस्तीत तुमची ताकत दिसेल..पुढच्या वर्षी परिस्थिती वेगळी असेल - अमोल कोल्हे - नारायणगाव
तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रेचा शुक्रवारी चौथा दिवस होता. शुक्रवारची सायंकाळ गाजली कुस्त्यांच्या दंगलीमुळे...नारायणगावात तब्बल ४ तास कुस्त्यांची दंगल रंगली.
महाराष्ट्रात मोठी अटीतटीची लढाई सुरु असताना नेता विरुद्ध अभिनेता अशी निवडणुकीची दंगल सुरु होती. त्यानंतर नेता अभिनेता दोघेही मुंबईकडे रवाना झाले आणि तमाशाची पंढरी म्हणून एक वेगळी ओळख असणाऱ्या नारायणगावच्या यात्रेतील कुस्तीच्या दंगलीला नेता व अभिनेत्याने हजेरी लावली. यावेळी आढळराव पाटील व डॉ. कोल्हे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. मात्र, यावेळी कुस्तीच्या दंगलीत तरुण विरुद्ध तरुणी हेच मुख्य आकर्षण पहायला मिळाले.
तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील ग्रामदैवत मुक्ताई देवी व काळोबा देवस्थानच्या यात्रेचा शुक्रवारी चौथा दिवस होता. शुक्रवारची सायंकाळ गाजली कुस्त्यांच्या दंगली मुळे...नारायणगावात तब्बल ४ तास कुस्त्यांची दंगल रंगली. यामध्ये पिंपळवंडीचा कुस्तीपटू राहुल माळी ने ३३ हजार ३३३ रुपयांची फायनल कुस्ती जिंकून नारायणगाव केसरीचा 'किताब पटकावला. यामध्ये मुलींच्या कुस्त्याही लक्षवेधी ठरल्या. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा या ठिकाणी भरली आणि त्यातही कुस्त्यांची दंगल असल्याने सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी या वेळी गर्दी केली होती. शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार शिवाजी आढळराव-पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली.