महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिरुरच्या नचिकेतचे युपीएससी परीक्षेत उत्तुंग यश, देशात १६७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

नचिकतेचे प्राथमिक शिक्षण पिंपळे खालसा येथील येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात गेला. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.

By

Published : Apr 7, 2019, 12:44 PM IST

नचिकेत आणि आई वडील

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपळे खालसा या गावातील नचिकेत शेळके या तरुणाने यात उत्तुंग यश मिळवले आहे. देशातून त्याचा १६७ वा क्रमांक आला आहे. नचिकेतच्या या यशासाठी त्याच्या गावकऱ्यांकडून त्याचा सत्कार करण्यात आला. सर्व परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

नचिकेतच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे

नचिकतेचे प्राथमिक शिक्षण पिंपळे खालसा येथील येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी तो पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात गेला. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर त्याने या परीक्षेत यश मिळवले.

नचिकेतला लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा होती, असे त्याचे आई वडील सांगतात. त्याचे आई वडील दोघेही प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यामुळे घरात शिक्षणाचे वातावरण होते. नचिकेतच्या कामगिरीचा अभिमान वाटतो अशी भावना त्याच्या आई वडिलांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details