महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे साधेपणाने ईद साजरी, कोंढव्यात सर्व धर्मियांना दूध वाटप - eid celebration in pune

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घरीच साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. त्यामुळे, यातून वाचलेले पैसे या सामाजिक उपक्रमावर खर्च करण्यात आले. शहरातील कोंढवा येथे सर्व धर्मियांना १ हजार लिटर दूध वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगसह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.

Muslim distributed milk on eid
कोंढव्यात सर्व धर्मियांना दूध वाटप

By

Published : May 26, 2020, 10:24 AM IST

पुणे- शहरातील कोंढवा येथे सर्व धर्मियांना १ हजार लिटर दूध वाटप करण्यात आले. ईद -उल -फित्र (रमझान ईद ) निमित्त दूध वाटप करून ईद साजरी केली गेली. सामाजिक कार्यकर्ते साबीर रहमान शेख यांनी हा उपक्रम केला. न्यू ग्रेस स्कूल कोंढवा येथे हा कौतुकास्पद कार्ययक्रम पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घरीच साधेपणाने ईद साजरी करण्यात आली. त्यामुळे, यातून वाचलेले पैसे या सामाजिक उपक्रमावर खर्च करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगसह शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला.

ABOUT THE AUTHOR

...view details