पुणे - शहराजवळील केसनंद गावात एका हिंदू समाजातील व्यक्तीचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे मुलगा येऊ शकला नाही. अखेर गावातील काही मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत माणुसकीचे दर्शन घडविले.
हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम तरुणांचा पुढाकार - pune social news
हिंदू समाजातील व्यक्तीचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे मुलगा येऊ शकला नाही. अखेर गावातील काही मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेत मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करीत माणुसकीचे दर्शन घडविले.
केसनंद गावात राम क्षीरसागर (वय 65) या व्यक्तीचे रविवारी निधन झाले. मृत राम यांचा एक मुलगा लॉकडाऊनमुळे दुसऱ्या गावात अडकून पडला. एक मुलगा त्यांच्याजवळ होता. परंतु, परिस्थिती हालाखीची असल्यामुळे अंत्यसंस्कार कसे करणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर गावातील हिंदू, मुस्लीम तरुणांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
गावातील जान महमद पठाण, अप्पा शेख, रहिमभाई शेख, आसीफ शेख, सद्दाम शेख, अलताप शेख, साहेबराव जगताप यांनी पुढाकार घेतला. सामाजिक एकोपा जपत हिंदू, मुस्लीम बांधवांनी राम क्षीरसागर यांचा मृतदेह स्मशान भूमीमध्ये 'राम नाम सत्य है' चा जप करत नेत त्यांच्यावर अंत्यविधी केला.