पुणे -खराडी परिसरात दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या आवारात मृतदेह आणून मुस्लीम समाजाकडून आंदोलन करण्यात आले. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
खराडी परिसरात मुस्लीम समाजाची दफनभूमी नाही. दफनभूमी व्हावी यासाठी मागील ३ वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. परंतु, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेवटी गुरुवारी (ता.07) एका व्यक्तीचा मृतदेह महापालिकेच्या आवारात आणून दफणभूमीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.