महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरकोळ पैशांच्या वादातून पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा खून - पिंपरी चिंचवड पोलीस कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये दारू प्यायल्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. दरम्यान, १२५ रुपये दिल्यावरून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

pimpari chinchwad police
किरकोळ पैशांच्या वादातून पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचा खून

By

Published : May 19, 2020, 10:31 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये दारू प्यायल्यानंतर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. दरम्यान, १२५ रुपये दिल्यावरून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संतोष कुलकर्णी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर गणेश थोरात असे आरोपीचे नाव आहे. दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. अवघ्या पाच तासात आरोपीला सांगवी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात मृत संतोष आणि गणेश हे दारू प्यायला बसले होते. दोघांची ओळख नव्हती. मात्र, दारू प्यायला एकत्र बसल्याने एकमेकांना ते दुः ख सांगत होते. तेव्हा, आरोपी गणेश थोरातने दहा हजार रुपये हवे असल्याचे मृत संतोषला म्हटले. त्यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या संतोषने "मी तुला दहा हजार देतो असे म्हटले, पण प्रत्यक्षात खिशात केवळ १२५ रुपयेच होते." ते त्याने गणेशने काढून दिले. मात्र, आरोपी गणेशला याचा राग आला आणि "दहा हजार रुपये देतो, असे म्हटलास आणि केवळ १२५ रुपयेच दिले." असे म्हणून, डोक्यात दगड घालून संतोषचा खून केला. अशी कबुली आरोपीने दिली आहे. संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ही घटना रस्त्याच्या कडेला घडली असून लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर जास्त वाहतूक नाही.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व माहिती घेतली. अवघ्या पाच तासात आरोपी गणेश यादवला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग यांच्या पथकातील पोलीस अधिकारी यशवंत साळुंखे, गोविंद चव्हाण, नरळे, केंगले, भोजने, देवकर, गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर, बोऱ्हाडे आदींनी तपास केला.

ABOUT THE AUTHOR

...view details