पुणे : पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा बंद खोलीत मृतदेह आढळला. त्याचा खून झाला असण्याची शक्यता हिंजवडी पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह पाठविण्यात आला आहे.
गणपत सदाशिव सांगळे (वय- 25, रा. इंदापूर ) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. बंद खोलीतून दुर्गंधी येत असल्याने शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी हिंजवडी पोलिसांनायाबाबतची माहितीदिली होती. त्यानंतर संबंधित घटना समोर आली आहे.
हिंजवडीत लेबर कॉन्ट्रॅक्टरचा संशयास्पद मृत्यू; बंद खोलीत आढळला मृतदेह - पुणे पोलीस बातमी
पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी परिसरात एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह आढळला. त्याचा खून झाला असण्याची शक्यता हिंजवडी पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला फोन आला. त्यानुसार हिंजवडी पोलीसांनी बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांना मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.
तीन दिवसांपूर्वीची घटना?
मृतदेह तीन दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृत गणपत हा जांबे येथे एका भाड्याच्या खोलीत राहात होता. तो लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. मात्र, त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात नेमका त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.