पुणे - मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे माळवाडी येथे पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर बुधवारी सकाळी उलटला. यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी 2 तास प्रयत्न करून या टँकरमधून होणारी इंधनाची गळती थांबवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर इंधन वाहतूक करणारा टँकर उलटला - Mukul Potdar
पुण्यातील वारजे माळवाडी येथे पेट्रोल आणि डिझेल वाहून नेणारा टँकर बुधवारी सकाळी उलटला. यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी 2 तास प्रयत्न करून या टँकरमधून होणारी इंधनाची गळती थांबवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे.
अपघातग्रस्त ट्रक
अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एक इंधन वाहक टँकर वारजे माळवाडी येथील पुलाजवळ उलटला. त्यामुळे टँकरमधील पेट्रोल आणि डिझेल रस्त्यावर सांडले होते. हे सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी काही लोकांनी गर्दी केली होती. मात्र, पोलिसांच्या मदतीने त्यांना दूर करण्यात आले. त्यानंतर इंधनावर फोम आणि पाणी टाकून रस्ता स्वच्छ करण्यात आला आहे.