महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सैल झालेली दरड काढण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ब्लॉक सुरू - highway saftey

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ १२ मार्च ते २० मार्च दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग

By

Published : Mar 12, 2019, 2:26 PM IST

पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सैल झालेली दरड काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खंडाळा बोगद्याजवळ १२ मार्च ते २० मार्च दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात येणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील ब्लॉकच्या वेळा जाहीर केल्या आहेत. महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकच्या वेळा टाळून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्लॉकचा कालावधी

१) सकाळी १० ते १०:१५

2) सकाळी ११ ते ११:१५

3) दुपारी १२ ते १२:१५

४) दुपारी २ ते २:१५

५) दुपारी ३ ते ३:१५

शुक्रवार ते सोमवार या सुट्ट्यांच्या काळात द्रुतगती मार्गावर वाहतूक जास्त असते. म्हणून शुक्रवार १५ मार्चला दुपारी ३:१५ ते सोमवार १८ दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील. यापूर्वीही दरड हटवण्यासाठी एक्स्प्रेस वेवर ब्लॉक घेण्यात आला होता. पावसाळ्याच्या पूर्वी एक्स्प्रेसवेवरील दरड हटवण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.

ABOUT THE AUTHOR

...view details