पुणेMovie Global Adgaon:मनोरंजनातून समाज प्रबोधन हे ध्येय घेऊन वाटचाल करणारी 'सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट छत्रपती संभाजीनगर' या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत आणि सोलापूर जिल्ह्याचे भूमिपूत्र तसेच छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्राप्त उद्योजक मनोज कदम निर्मित हा चित्रपट आहे.
29 चित्रपटांमधून निवड:इफ्फी गोवा येथे 'फिल्म बझार'मध्ये दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता 'ग्लोबल आडगाव'चे प्रदर्शन मिरामार रिसॉर्ट गोवा क्यूब १ येथे जगभरातील फिल्मप्रेमी आणि तज्ज्ञ लोकांसमोर होणार आहे. त्यांच्यासाठी विव्हींग रूममध्ये चार दिवस म्हणजे २१ ते २४ नोव्हेबरपर्यंत चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहू शकणार आहेत. या चित्रपटाची निवड २९ सिनेमांमधून महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालयाकडून 'इफ्फी गोवा फिल्म बझार'साठी करण्यात आली आहे. ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. याची अधिकृत घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
चित्रपटाचं वैशिष्ट्य आणि यश:'ग्लोबल आडगाव' या सिनेमामधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर 'ग्लोबलायझेशन' अशा महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करण्यात आलेलं आहे. हा सिनेमा बघताना प्रेक्षक आपल्या डोळ्यातील पाण्याला थांबवू शकत नाही. अशा अत्यंत भावनिक, संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना भावनिक करणाऱ्या 'ग्लोबल आडगाव' या चित्रपटाच्या निर्मितीमागे अनेक पुरस्कारप्राप्त लेखक, दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे, निर्माता आणि प्रसिध्द उद्योजक मनोज कदम तर उद्योजक अमृत मराठे सह-निर्माता आहेत. या सिनेमाला या अगोदर अमेरिका येथील न्यू जर्सी येथील उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला आहे. पुणे इंटनॅशनल फिल्म फेस्टिवल, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल, मेलबर्न फेस्टिवल असे 11 पेक्षा जास्त नामांकन मिळाले आहेत.