महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोटरसायकल चोरणाऱ्या मामा भाच्यांना बारामतीत अटक

मागील काही दिवसांपासून बारामती शहर व एमआयडीसी परिसरातून मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावरून मामा भाच्याच्या जोडीला ताब्यात घेतले.

मोटरसायकल चोर अटकेत
मोटरसायकल चोर अटकेत

By

Published : Dec 31, 2020, 10:27 PM IST

बारामती - मोटरसायकल चोरणाऱ्या मामा भाचाला तालुका पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपयांच्या सहा मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. संदीप बाळू माने (वय ३५ वर्ष,रा.खंडोबा नगर,बारामती) व स्वप्नील काळूराम भोसले (वय २७ वर्षे ,राहणार.निरवागज, ता. बारामती) अशी मोटरसायकल चोरणाऱ्या मामा भाच्यांची नावे आहेत.

मामा सराईत मोटरसायकल चोर-

मागील काही दिवसांपासून बारामती शहर व एमआयडीसी परिसरातून मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावरून मामा भाचाच्या जोडीला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता बारामती तालुका व बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील दोन वर्षापासून २ स्टार सिटी, १ पॅशन, २ स्प्लेंडर, १ सुझुकी, अशा सहा मोटरसायकली चोरल्याचे समोर आले आहे. या मामा भाच्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपी संदीप माने हा मोटरसायकल चोरी करणारा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई-

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉनस्टेबल नंदू जाधव, मंगेश कांबळे, विनोद लोखंडे,विजय वाघमोडे, राहुल पांढरे, रणजीत मुळीक यांनी केली आहे.

हेही वाचा-निरोप 2020: मंबईने देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असतांना दिला लढा

ABOUT THE AUTHOR

...view details