पुणे - वाहन चालविताना नको ते धाडस केल्यास ते एकप्रकारे अपघाताला निमंत्रण देणारे असते. यावर्षी शहरात अशाच वेगवेगळ्या 392 अपघातात 123 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी जानेवारी ते नोव्हेंबर, 2020 या कालावधीतील आहे.
नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्यांची संख्या दिवेंसदिवस वाढत चालली आहे. त्यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वैयक्तिक वाहन प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत भर पडत आहे. अरूंद रस्ते, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांची मालिका कायम आहे.
या कारणांमुळे होतात अपघात
वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही विनाहेल्मेट दुचाकी चालविले, मोटार चालिवताना सीटबेल्टचा वापर न करणे, सुसाट वाहने चालविणे, सिग्नलवर वाहतूक कर्मचारी न दिसल्यास नियमभंग करणे, डाव्या बाजूने वाहन न चालविणे, अशा कारणांमुळे अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.