महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात जप्त केलेले 2000 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज नष्ट - सीमाशुल्क मंडळ

सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह (Directorate of Intelligence Intelligence) केंद्रीय अप्रत्यक्ष कर (central indirect tax) आणि सीमाशुल्क मंडळाच्या (customs board) कार्यालयांनी 42 हजार 54 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ, 17 लाख 10 हजार 845 गोळ्या, 72 हजार 757 बाटल्या आणि खोकल्याच्या 1633 बाटल्या नष्ट (More than 2000 kg of drugs seized in Pune destroyed) केल्या.

By

Published : Jun 8, 2022, 10:51 PM IST

पुणे: सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाच्या अनुषंगाने, महसूल गुप्तचर संचालनालयासह केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या कार्यालयांनी 42 हजार 54 किलो पेक्षा जास्त अंमली पदार्थ, 1710845 गोळ्या, 72757 बाटल्या आणि खोकल्याच्या 1633 बाटल्या नष्ट केल्या. अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि तस्करीच्या विरोधात एक मजबूत संदेश देण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन यांनी देशभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या दुरुपयोग आणि तस्करीविरूद्ध मजबूत संदेश देण्यासाठी कार्यवाहीमध्ये भाग घेतला.

कार्यवाहीचा एक भाग म्हणून, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयाने पुणे सीमाशुल्क आयुक्तालय आणि महसूल गुप्तचर संचालनालय, पुणे प्रादेशिक युनिट यांनी जप्त केलेल्या 2439 किलो ड्रग्जची विल्हेवाट लावली. यासाठी अत्याधुनिक प्लाझ्मा गॅसिफिकेशन आधारित भस्मीकरण सुविधेवर नष्ट करण्यात आली. महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड, एमआयडीसी, रांजणगाव. डॉ. मुक्ता पुणतांबेकर, संचालिका आणि डॉ. सोनाली काळे, समन्वयक, मुक्तांगण पुनर्वसन केंद्र, पुणे यांनीही या कार्यवाहीला हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details