महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मदत मागणाऱ्या तरुणीचा विनयभंग, पुण्यातील कॅम्प परिसरातील घटना - pune camp

मोबाईल फोन बंद पडल्यामुळे तिने रस्त्यावरील एका अज्ञात व्यक्तीकडे मित्राला पत्ता विचारण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून कॉल लावण्याची विनंती केली होती. त्या व्यक्तीने तरुणीला कॉल लावून दिल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस

By

Published : May 16, 2019, 4:36 AM IST

पुणे - कॅम्प परिसरात पत्ता शोधण्यासाठी मदत मागणाऱ्या तरुणीचा एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.

घटनेबाबत माहिती देताना पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावर हा प्रकार घडला. यावेळी एक तरुणी खरेदीसाठी महात्मा गांधी रस्त्यावर आली होती. तिचा मोबाईल फोन बंद पडल्यामुळे तिने रस्त्यावरील एका अज्ञात व्यक्तीकडे मित्राला पत्ता विचारण्यासाठी त्याच्या मोबाईल वरून कॉल लावण्याची विनंती केली होती. त्या व्यक्तीने तरुणीला कॉल लावून दिल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याला जोरदार प्रतिकार केला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, संशयित तेथुन पळून गेला असुन, लष्कर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details