महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात भाजपकडून मुक्तपणे गुंडांचा आणि पैशाचा वापर सुरू, मोहन जोशींचा आरोप - bjp

पालकमंत्री गिरीश बापट पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.

मोहन जोशींचा भाजपवर आरोप

By

Published : Apr 23, 2019, 10:15 AM IST

Updated : Apr 23, 2019, 10:38 AM IST

पुणे - भाजपकडून रात्रीपासून मुक्तपणे गुंडांचा आणि पैशाचा वापर सुरू असल्याचा आरोप पुणे लोकसभा काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केला आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचेही जोशी म्हणाले.

पालकमंत्री गिरीश बापट पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून सत्तेचा गैरवापर करत आहेत. ज्या ठिकाणी काँग्रेसची व्होट बँक आहे, विशेषतः झोपडपट्टी परिसर असलेला तळजाई, सहकारनगर, वडारवाडी या परिसरात पोलिंग एजंटला मतदान कक्षात जाण्यास मज्जाव करत आहेत.

काही भागात नियमानुसार काँग्रेसने टाकलेले बूथ काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही बूथबाहेर भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यात असलेल्या रंगाचे मांडव टाकले आहेत. हे आचारसंहितेत बसत नाही. अशाप्रकारे गिरीश बापट यांच्याकडून सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर होत आहे. यासंदर्भात पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. रात्रीपासून कुठेही नाकाबंदी नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीसाठी मुक्तपणे पैशाचा आणि गुंडाचा वापर केला असल्याचे जोशी म्हणाले.

Last Updated : Apr 23, 2019, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details