पुणे- 'बुडत्या जगाचा कळवळा धारण करून जे लोक येतात त्यांचे हे जग नसते. बाहेरचे जग विषारी आहे, हे माहिती असूनही आपल्याला काम करावे लागणार, या शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी सभोवतालच्या सद्य परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले. आळंदी येथे जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्यात ते बोलत होते.
हेही वाचा - 'कर्जमाफीचा लाभ ५ लोकांनाही नाही, द्यायचं नाही तर फसवता का?'
माणूस सगळे मिळवतो. मात्र सुखी होतो का? त्याला शांती मिळते का? तर नाही. जितक्या सोयी जास्त, तितक्या आत्महत्या जास्त, तितका वेडेपणा जास्त असे जागतिक आकडेवारी सांगते. राक्षस भौतिक सुखाच्या मागे लागणारे होते. कबीर महाराज म्हणायचे 'कागज लेखी, मै कहता हूँ आँखन देखी', ही आँखन देखीची परंपराही आपल्याकडे कायम असल्याचे मोहन भागवत यावेळी म्हणाले.