पुणे -पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात ( Sidhu Moose Wala Murder ) अटक करण्यात आलेला आरोपी संतोष जाधववर मोक्कानंतर्गत कारवाई ( Mocca action against criminals ) करण्यात आली आहे. यात संतोष जाधवसह ( santosh jadhav in Sidhu Moose Wala Murder ) त्याच्या साथीदारांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ( Pune Rural Police ) मोक्कानंतर्गत कारवाई केली आहे. संतोष जाधव हा मुळचा पुण्यातील मंचर येथील आहे.
आरोपींविरोधात विरोधात मोक्का कारवाई -मोक्कानंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यामध्ये संतोष सुनील जाधव, जीवनसिंग दर्शनसिंग नहार, श्रीराम रमेश थोरात , जयेश रतीलाल बहिरट, जिशान इलाहीबक्श मुंढे, गणेश तारु, वैभव उर्फ भोला शांताराम तिकटारे, रोहित विठ्ठल तिकटारे, सचिन बबन तिकटारे-यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या आरोपींविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. संतोष जाधव विरोधात ही दुसरी मोक्का कारवाई आहे.
गुन्हेगारीत तरुणांचा वाढता सहभाग -गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली असून अनेक तरुणांचा सहभाग हा वाढत आहे. संतोष जाधव आणि त्याच्या साथीदारांनी नारायणगाव मधील एका व्यवसायिकाकडे खंडणी मागितली होती. वारंवार त्याच्याकडे संतोष जाधव गँग मधील तरुण हे खंडणी मागत होते. पण जेव्हा संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. तेव्हा या व्यवसायिकांने यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यावरून पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली होती. यासर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण? -मानसा गावात दोन हल्लेखोरांनी सिद्धू मूसेवाला यांच्या वाहनावर एके- ९४ मधून ३० राऊंड गोळीबार केला. कारमध्ये सिद्धूसोबत त्यांचे दोन साथीदारही होते. या अपघातात एका साथीदाराचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या संपूर्ण घटनेच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षा कमी केली होती.