महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kasba ByPoll : कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात मनसेही उतरणार; सोमवारी राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान ठरणार उमेदवार - कसबा

कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे सोमवारीपासून दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी कसबा पोटनिवडणूकीसाठी उमेदवार ठरणार आहेत.

कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक
कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक

By

Published : Feb 4, 2023, 10:53 PM IST

कसबा विधानसभा मतदारसंघातील मनसेचा संकल्प मेळावा

पुणे : कसबा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे त्यांची भूमिका ही अशी आहे की, जर एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तर आणि त्यामध्ये जर पोटनिवडणूक झाली त्याच कुटुंबातील सदस्य असले तर निवडणूक लढायचे नाही. त्यामुळे आधीच कार्यकर्त्यांचा आग्रह आणि भाजपने टिळक कुटुंबिया बाहेर दिलेला उमेदवार यामुळे आता कसब्याची निवडणूक चुरशीची होणार आहे.

सोमवारी ठरणार उमेदवार : मनसेकडून सोमवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कसबा पोटनिवडणुकीसाठी नावे जाहीर करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी शहर कार्यकारणीने तयार केलेल्या कसब्यासाठीच्या इच्छुकांची यादी राज ठाकरे तपासणार आहेत. हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन मनसे कसबा विधानसभा जिंकू शकते असा विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवला आहे. कसब्यााठी मनसेकडून गणेश भोकरे, अजय शिंदे, गणेश सातपुते, आशिष देवधर आणि निलेश हांडे, प्रल्हाद गवळी, बाळा शेडगे आदींची नावे चर्चेत आहे.

राज ठाकरे करणार उमेदवाराची घोषणा : राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कडून सुद्धा पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे . मनसेकडून काल कसबा विधानसभा मतदारसंघात संकल्प मेळावा घेण्यात आला. या संकल्प मेळाव्याला मनसेचे नेते बाबू वागस्कर शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह अनिल शिदोरे त्याचबरोबर गणेश सातपुते तसेच सर्व इच्छुक उमेदवार होते. त्यावेळी बोलताना त्यांनी आमची लढण्याची इच्छा आहे आणि आपण लढले पाहिजे अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आता राज ठाकरे सोमवारी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे . कसबा मतदारसंघाची उत्सुकता आणखी जास्त वाढली आहे.


भाजपकडून उमेदवारी जाहीर : कसबा आणि चिंचवडच्या जागांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून त्याआधी घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. दुसरीकडे भाजपकडून कसब्यासाठी आणि चिंचवडसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमध्ये दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी वैष्णवी जगताप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी कसबा आणि चिंचवडच्या जागांसाठी मतदान पार पडणार असून, त्याआधी घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

महाविकास आघाडीकडे लक्ष : हेमंत रासने हे स्थायी समितीचे तीन वेळा अध्यक्ष राहिले आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपकडून टिळक कुटुंबाबाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपकडून हेमंत रासने यांच्यासह गणेश बिडकर, धीरज घाटे आणि टिळक कुटुंबातील शैलेश टिळक आणि कुणाल टिळक इच्छूक होते. भाजपच्या उमेदवारीनंतर आता सर्वांचे लक्ष रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे लागले आहे.
हेही वाचा :Shambhuraj Desai Challenges Aaditya Thackeray : हिंमत असेल तर, पाटणमधून निवडणूक लढवून दाखवा; शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details