महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 15, 2022, 4:05 PM IST

Updated : Dec 15, 2022, 5:09 PM IST

ETV Bharat / state

Rohit Pawar : रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना इशारा; म्हणाले...

मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Black Ink) यांच्यावर शाईफेक केल्यानंतर पाटील हे आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी थेट पवार कुटुंबाला चॅलेंज करत सर्व प्रकरणे बाहेर काढू असे सांगितले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar Challenge) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, पवार कुटूंबियांना चॅलेंज सर्वांनीच केले आहे. पवार साहेब, अजित दादा, मलाही चॅलेंज केले आहे. चॅलेंज राजकीय करणे हे योग्य आहे. त्या पद्धतीने त्यांनी चॅलेंज केले असेल, तर आम्ही उत्तर देऊ, असे यावेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar reply Chandrakant Patil) म्हणाले आहेत.

Rohit Pawar Big Statement
Rohit Pawar Big Statement

रोहित पवारांचं सनसनाटी वक्तव्य

पुणे -आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडकुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार रोहित पवार (Rohit Pawar Challenge) हे देखील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? याबाबत विचारले. त्यावर ते म्हणाले की, विस्तार व्हायला हवा. अनेक लोकांना मंत्री व्हायचे आहे. त्यांच्यात चुरस लागली आहे, असे रोहित पवार म्हणाले.

अनेक लोकांना मंत्री व्हायचं : पुण्यात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत घोडकुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की विस्तार व्हायला हवं. अनेक लोकांना मंत्री व्हायचं आहे. त्यांच्याच चुरस लागली आहे. विस्तार हा पुढे पुढे होत चाललं आहे. जी 4- 4 खाती आत्ता मंत्र्यांना देण्यात आली आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.

17 तारखेला महाविकास आघाडीकडून मोर्चा : मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला हवं आणि यात अनेक लोकांना संधी मिळायला पाहिजे, असे देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. 17 तारखेला महाविकास आघाडीकडून जो मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चेला परवानगी मिळालेली नाही. त्याबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, परवानगी मिळायला पाहिजे. मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक हे सहभागी होणार आहे. महाराष्ट्राचे अस्मितेसाठी लोक त्या ठिकाणी येणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत परवानगी मिळेल, अशी आशा आहे.

संतांच्या बाबतीत कोणीही बोलू नये :मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी सरकारी प्रॉपर्टीच्या कोणत्याही पद्धतीने नुकसान करू नये, असे देखील आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. सुषमा अंधारे यांच्या बाबतीत पवार यांना विचारले असते ते म्हणाले की, कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत संतांच्या बाबतीत कोणीही बोलू नये. जर कोणी बोललं तर लगेच माफी मागितली पाहिजे. माफी नाही मागितली तर लगेच मागितली पाहिजे. बोलायचं असेल तर सामाजिक विषयावर बोलायला पाहिजे, असे देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

ट्विटर अकाऊंट बद्दल कारवाई करा :सीमावाद बाबत रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, अमित शाह यांचे अभिनंदन करतो. दोन राज्यांचा वाद आहे, त्याबद्दल बैठक घेतली. सुप्रिया ताई यांच्यासह सगळ्या महविकास आघाडी खासदारांचे यांचे देखील अभिनंदन करतो. मात्र भाजप, शिंदे गट खासदार पुढे आले नाहीत. एक विनंती आहे ते गृहमंत्री आहेत. कर्नाटकमध्ये असलेले मराठी सामाजिक सेवक आहेत. त्यांना अनेक अडचणी येत आहेत, अशी वागणूक त्यांना मिळू नये, अभिव्यक्ती स्वतंत्र आहे. पिवळे काळे झेंडे घेऊन राजकीय आंदोलन करतात. त्यांना शांत केले पाहिजे. हे झाले नाहीतर महाराष्ट्रीयन माणसे शांत बसणार नाहीत. ट्विटर अकाऊंट बद्दल कारवाई करा, पण व्हिडिओ आणि वक्तव्य केले त्याचे काय कर्नाटकचे 4 महिन्यात निवडणुका आहेत. राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणी ही मराठी अस्मिता बद्दल खेळले नाही पाहिजे, असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

Last Updated : Dec 15, 2022, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details