दौंड (पुणे) -दौंड तालुक्यात दिनांक 14 ते 17 ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान सुमारे 185 मिमी पाऊस होऊन मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आहे. ओढ्याचे तसेच पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे ऊसाचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे वाहून जाऊन पशुधनाची देखील मोठी हानी झाली आहे. पुराचे पाणी शिरून घरातील जीवनावश्यक वस्तुंचे, घर व वखारीमधील साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून नागरिक व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीमुळे दौंड तालुक्यातील अनेक मोठे व छोटे रस्ते, छोटे पूल, बंधारे वाहून गेले आहेत. त्याची दुरुस्ती तातडीने व्हावी. याबाबत आमदार राहुल कुल यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा केली.
दौंड तालुक्यातील समस्यांबाबत आमदार कुल यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट - MLA Rahul Kul
परतीच्या पावसामुळे दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी, याबाबत आमदार राहूल कुल यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.
तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन पीएमआरडीए अंतर्गत दौंड तालुक्यातील समाविष्ट गावांतील विविध विकासकामांबाबत चर्चा केली. महसूल कर्मचारी व कोतवाल संघटना यांचे निवेदन मागील आठवड्यात प्राप्त झाले असून त्यानुसार पुणे जिल्ह्यात कोतवाल पदोन्नोतीबाबत महाराष्ट्र शासननिर्णयाची तत्काळ अंमलबजावणी होण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
हेही वाचा -दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल, पुणे आरटीओत 6,455 वाहनांची नोंद