महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची "ड्यूटी", शरद पवारच राज्य चालवतात केले मान्य'

सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दीला शून्य मार्क देईन, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 31, 2020, 4:49 PM IST

Updated : Oct 31, 2020, 5:06 PM IST

पुणे -भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांची ड्युटी आहे. ती त्यांनी बजावलीच पाहिजे. पवारांचा सल्ला घेण्यात गैर काय अस सांगून संजय राऊत यांनी एक प्रकारे शरद पवारच महाराष्ट्र चालवत आहेत अन् उद्धव ठाकरे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत, हे एक प्रकारे मान्य केले आहे, असा टोला ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

बोलताना चंद्रकांत पाटील

पुण्यात ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा सल्ला घ्यावा किंवा पार्थ पवारांचा आमच्या पोटात दुखण्याचे कारण काय आहे. त्यांना सरकारच्या वर्षपूर्तीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या सरकारच्या एक वर्षाच्या कारकिर्दीला शून्य मार्क देईन. कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुणांना, ओला दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना व समाजातील विविध घटकांना विचारल्यावर मग या सरकारचा नाकर्तेपणा कळेल, अशी टीका पाटील यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे 'फेविकॉल'

राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांनी सत्तेचे नवे फेविकॉल तयार केले आहे. जे असे चिटकून आहेत की काही केल्या तुटत नाही. या आघाडीतील पक्षामध्ये सकाळी नाराजी होते तर दुपारी एकत्र बसतात, अशी बोचरी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा -15 दिवसांत सरकार पडेल अशा पैजा लावल्या, पण... - संजय राऊत

Last Updated : Oct 31, 2020, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details