पुणे- बारामतीतील अंजनगाव येथे अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने शाळेत निघालेल्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यानंतर तिच्याशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी महादेव भिकाराम परकाळे (वय-45) याच्या विरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी 12 वर्षांची असून यासंबंधी अधिक माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे.
बारामतीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपी गजाआड - baramati crime
बारामतीतल अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडितेला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केली आहे.
यानुसार, 23 जानेवारीला पीडित मुलगी तिच्या बहिणीसोबत शाळेत जात असताना आरोपी देखील दुचाकीवरून त्याच रस्त्याने निघाला. यानंतर त्याने पीडितेसह तिच्या बहिणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले; आणि लैंगिक चाळे केले. तसेच याबाबत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. पीडिता घाबरलेल्या अवस्थेत दिसल्याने आईने विचारपूस केली. यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
या प्रकरणावर गावात पडदा टाकण्यात आला होता. परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत पीडितेच्या वडीलांनी हा प्रश्न उपस्थित केला. यानंतर गावातील अन्य मुलींशीही अशा प्रकार घडू शकतो, यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली.