महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत लवकरच श्वान प्रशिक्षण केंद्र उभे राहणार - अजित पवार

पोलीस उपमुख्यालयाच्या नजीकच जवळपास २० एकर जागेत सुमारे ५० कोटी रुपयांचे सर्व आवश्यक बाबींयुक्त प्रशस्त श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असेही पवार म्हणाले.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Nov 18, 2021, 5:20 AM IST

Updated : Nov 18, 2021, 5:32 AM IST

बारामती (पुणे) -अमली पदार्थ, घातक स्फोटके आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांना श्वानांची नेहमीच मदत होत असते. यासाठी लवकरच बारामतीत होत असलेल्या पोलीस उपमुख्यालयाच्या नजीक श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते बारामतीत बोलत होते. पोलीस उपमुख्यालयाच्या नजीकच जवळपास २० एकर जागेत सुमारे ५० कोटी रुपयांचे सर्व आवश्यक बाबींयुक्त प्रशस्त श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे, असेही पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यातील पोलीस खात्याच्या प्रत्येक पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस आयुक्तालयाकडे श्वान पथक असते. यापुढे आता राज्यातील पोलीस खात्यांना मदत करणारे प्रशिक्षित श्वान बारामतीतून राज्याच्या विविध ठिकाणी दाखल होणार आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने श्वान पथके महत्त्वाची भूमिका बजावत असतात. नक्षलवादी कारवाया झाल्यावर चोरी, बॉम्ब स्फोट सारख्या घटना तसेच अति महत्त्वाच्या व्यक्ती येणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी प्रशिक्षित श्वान चांगल्या पद्धतीने काम करत असते. बारामतीत होत असलेल्या श्वान प्रशिक्षण केंद्रात सर्व आवश्यक बाबींचा समावेश असणार आहे. २० एकर जागेत सुमारे ५० कोटी रुपयांचे प्रशस्त श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा -Leopard Attack : बिबट्याचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Nov 18, 2021, 5:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details