महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या' - अजित पवार न्यूज

कोरोनाच्या संकटाशी सामना करताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) दिले.

Minister Ajit Pawar
'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या'

By

Published : Jun 29, 2020, 7:50 PM IST

बारामती (पुणे) - कोरोनाच्या संकटाशी सामना करताना त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) दिले. तसेच कोरोनाच्या रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळण्याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले. कोरोना प्रार्दुभाव निर्मुलन आणि विविध विकास कामांची आढावा बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या'

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दक्ष राहून काम करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सामाजिक अंतर राखले जाईल याकडे विशेष लक्ष द्यावे. रूग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच तपासणीची प्रक्रीया वाढवावी. कोविड आणि नॉन कोविड रुग्ण या दोघांनाही वेळेत उपचार मिळणे आवश्यक असल्याने आरोग्य विभागाने याची खबरदारी घ्यावी, असेही अजित पवार म्हणाले. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच कोव्हीडशी लढण्याकरीता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्रीसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे पवार म्हणाले.

'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या'

विकासकामे ही दर्जेदार व वेळेतच झाली पाहिजेत. जरी कोरोनाचे संकट असले तरी त्याचा परिणाम विकास कामांवर होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखत काम करावे. जेथे अतिक्रमण असेल ते योग्य ती कार्यवाही करून काढून टाकण्यात यावे. परंतु, सदर ठिकाणी असलेल्या नागरिकांची गैरसोय होऊ न देता त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशाही सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

'कोरोनाशी लढताना विकासकामांवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या'
यावेळी नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता बारवकर, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर , नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details