पुणे - शासनाने पॉलीथीन दूध पिशवसाठी योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा, अन्यथा दूध व्यवसायिक टँकर आणि कॅनद्वारे शहरातील रस्त्यांवर बसून दुधाची विक्री करतील, असा इशारा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यवसायिक कल्याणकारी संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
शासनाने 'पॉलिथिन दूध पिशवी'ला पर्याय उपलब्ध करून द्यावा, दूध उत्पादकांची मागणी
मुख्यमंत्री आणि दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
संघाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील लाखो शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र ,शासनाने दूध खरेदीचे अनुदान देखील थकवले आहे. त्याप्रमाणेच पॉलीथीन बंदीमुळे दूध व्यावसायिकांच्या समोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने दुग्ध व्यवसायिकांचे थकीत अनुदान 30 जुलैपर्यंत द्यावे. तसेच पॉलीथीनसाठी योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये दूध उत्पादक व्यवसायिकांच्या प्रश्नांसंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे.