पुणे -राज्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर, आता पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्तेही पुढे आले आहेत. आज(रविवार) तालुक्यातील उंडवडी येथे पडळकरांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीकडून बारामतीत पडळकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदविला गेला. तर, दुसरीकडे बारामतीत भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देत पडळकर यांना समर्थन देण्यात आले होते. त्यानंतर आज(रविवार) बारामती तालुक्यातील उंडवडी येथे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्यासह गोविंद देवकाते, अॅड. ज्ञानेश्वर माने, जयराज बागल, विशाल कोकरे, प्रकाश मोरे, प्रमोद खराडे, भाऊसाहेब मोरे व इतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार पडळकर यांच्या प्रतिमेस दुधाचा अभिषेक घालून त्यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.