पुणे - राजगुरुनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आंबेडकरांचे स्मारक राजगुरूनगरमध्ये उभारण्यात यावे, अशी मागणी मांडण्यात आली. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसचे, राजगुरूनगर नगरपरिषदेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
राजगुरुंच्या भूमीत होणार आंबेडकरांचे स्मारक, नगरपरिषदेचा पुढाकार - pune
अनेक दिवसांपासून राजगुरुनगरमध्ये आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या भूमित आंबेडकरांचे स्मारक ही त्यांना वेगळ्या प्रकारची आदरांजली असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.
अनेक दिवसांपासून राजगुरुनगरमध्ये आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या भूमित आंबेडकरांचे स्मारक ही त्यांना वेगळ्या प्रकारची आदरांजली असल्याचे येथील नागरिकांचे मत आहे. त्यानुसार नगरपरिषदेने आज निर्णय घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारसंवर्धन समितीने ना हरकत प्रमाणपत्र दिले. आहे. नगरपरिषद यासाठी पुढाकार घेईल, अशी माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली. त्यामुळे येणाऱया दिवसात राजगुरूनगरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक दिसेल अशी शक्यता आहे.